पुणे, ८ जुलै २०२३ : भारतात SUV कार खूप पसंत केल्या जातात आणि त्यात लहान सेगमेंट मधल्या SUV तर जास्तच आकर्षक ठरल्या आहेत. तसेच हॅचबॅक खरेदी करणारे ग्राहक देखील याकडे वळत आहेत. टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रँक्स या सेगमेंटमध्ये चांगली विक्री करत आहेत. या सेगमेंटची लोकप्रियता पाहून ह्युंदाई कंपनी ‘Exter micro’ SUV लाँच करणार आहे. या कारची किंमत आत्ता तरी जाहीर केली नाही, पण ही Hyundai कंपनीची सर्वात छोटी आणि स्वस्त एसयूव्ही कार असेल असा कंपनीचा दावा आहे.
नवीन exter SUV मध्ये १.२ लिटर पेट्रोल इंजिन आणि फॅक्टरी फिट सीएनजी किट मिळू शकते. 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स तसेच पर्यायी पेट्रोल इंजिनसह, तर CNG फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध असेल. यात असणारे पेट्रोल इंजिन 83bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सध्याच्या Venue, i20, Grand i10 Nios आणि Aura या कार मध्ये आधीच उपलब्ध आहे. हे शक्य आहे की ह्युंदाई एक्स्टरसाठी इंजिन थोडे ट्यून करेल. पण exter कार चा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी Tata Punch ला 1.2L, 3-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे 86bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचा पर्याय देखील आहे पण टाटा पंच सीएनजी व्हर्जन लवकरच लॉन्च होणार आहे. Hyundai ची Xter १० जुलै रोजी लॉन्च होणार आहे. म्हणजेच आजपासून २ दिवसांनी ही कार तुम्हाला बाजारात पाहायला मिळणार आहे.
Hyundai Xter कारच्या फीचर्स बाबतीत बोलायचे झाल्यास, Hyundai Xter कार Punch पेक्षा लांबी आणि रूंदीने मोठी असेल. Xter लांबी ३८००-३९०० मिमी, उंची १६३१ मिमी आणि व्हीलबेस २४५० मिमी असेल, तर Punch ची लांबी ३७०० मिमी, रुंदी १६९० मिमी, उंची १५९५ मिमी आणि व्हीलबेस २४३५ मिमी आहे.
कारचे अधिक फिचर्स कोणते?
पहिले तर स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम या कारमध्ये मिळेल. त्यानंतर Xeter मध्ये ड्युअल कॅमेरा आणि इलेक्ट्रिक सनरूफसह डॅशकॅम मिळेल. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, याबरोबरच यामध्ये स्टँडर्ड ६ एअरबॅग्ज, आयसोफिक्स, हिल होल्ड असिस्ट, 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सर्व सीट सीटबेल्ट रिमाइंडर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम हे फीचर्स असतील. तसेच सुरक्षिततेच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, वाहन स्थिरता व्यवस्थापन, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखी इतर फिचर्स देखील कारमध्ये दिसू शकतात.
कारची किंमत किती?
कंपनीने आधीच ११हजार रुपयांच्या रकमेसह Hyundai Xter ची बुकिंग सुरू केली आहे. ही मिनी एसयूव्ही पाच ट्रिमच्या एकूण 1१५ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. EX, S, SX, SX (O), Connect यांसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या कारची किंमत ६ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे