बारामतीत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत मैं भी डिजिटल मोहीमेला सुरुवात

बारामती २४ जानेवारी २०२१  :पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेची माहिती देण्यासाठी बारामती शहरातील पथविक्रेत्यांना श्री गणेश भाजी मंडई येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मैं भी डिजिटल मोहिमेंतर्गत पथविक्रेत्यांना आर्थिक परिस्थिती भक्कम करण्यास मदत होईल त्यांना डिजिटल साधनांची माहिती मिळावी.याविषयावर मुख्याधिकारी किराणराज यादव यांनी मार्गदर्शन केले तर गुगल पे ,फोन पे, युपीआय या डिजिटल माध्यमातून पथविक्रेत्यांना व्यवहार कसा करायचा याची अली मुल्ला यांनी माहिती दिली. तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा,अटल पेंशन योजना,डिजिटल कर्जप्रक्रिया तसेच बँकिग ऑनलाईन व्यवहार यांची माहिती दिली.

यावेळी हरित वसुंधरेच्या शपथेचे वाचन वैशाली अकिवाटे(क्षेत्रीय समन्वयक) महिला आर्थिक विकास महामंडळ, पथविक्रेते, कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी भारत गायकवाड, धुमाळ साहेब बँक ऑफ महाराष्ट्र, अली मुल्ला,दादा जोगदंड सहकार्य लाभले मान्यवरांचे व उपस्थित पथविक्रेत्यांचे वैशाली अकिवाटे यांनी आभार मानले.

न्युज अन कट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा