मुंबई, १८ डिसेंबर २०२०: नटेश्वराला नमन करून रंगभूमीची तिसरी घंटा आत्ता कुठे वाजली होती. त्यातूनच थोडिशी चिंतेत टाकणारी बातमी आली. “एका लग्नाची पुढची गोष्ट” या नाटकात मुख्य भूमिकेत आसलेल्या आभिनेते प्रशांत दामले हे कोरोना पाॅजिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वत: फेस बुक वर व्हिडिओ टाकत ही माहिती सर्वांना दिली आहे.
काय म्हणाले प्रशांत दामले……
प्रशांत दामले म्हणाले “मागच्या रविवारी झालेल्या चिंचवडच्या प्रयोगानंतर मला कणकण भासली, त्यामुळे मी मुंबईला आल्यावर माझी कोरोना चाचणी करून घेतली आणि त्यात मी काठावर पास झालो. तसा काठावर पास होण्याची सवय मला शाळेपासूनच आहे. पण, हा काठा डेंजर आसून डाॅक्टरांनी मला विश्रांती घेण्यासाठी सांगितले आसून मी बुधवारपासून सात दिवसांसाठी आयसोलेट झालो आहे”.
नाटकाचे बाकी प्रयोग रद्द…..
पुढे दामले हे नाटकाच्या प्रयोगाबद्दल ही बोलले ज्या मधे त्यांनी “उद्या दुपारचा व पर्वा दुपारचा गडकरी रंगायतन चा प्रयोग रद्द करावे लागले आहेत.”आसे म्हणाले तर “मी ठणठणीत बरा आहे पण डाॅक्टरांनी सात दिवस विश्रांती घ्यावीच लागेल आसे सांगितले आहे.”
बाकी कलाकारांबद्दल दिली बातमी…….
तर पुढे दामले म्हणाले, “सगळ्यात चांगली गोष्ट आहे की माझे सहकलाकार, बॅकस्टेजचे आर्टिस्ट हे ठणठणीत बरे आहेत. मीच थोडा काठावर आहे. काठावरचा मी थोडा मागे येतो आणि परत काम सुरू करतो. मी काळजी घेतो, तुम्ही सुद्धा काळजी घ्या.” असे म्हणत त्यांनी माहिती दिली.
आत्ता कुठे नाटकं सुरू झाली होती……
कोरोना मुळे तसही नाट्यसृष्टी डबघाईला आली असून आत्ता कुठे सरकारच्या नियमांचे पालन करत नाटकं सुरू झाली होती. तर “एका लग्नाची पुढची गोष्ट” नाटकाचा कोरोना नंतर शुभारंभ पुण्यातील गंधर्व थिएटरमध्ये झाला होता. जिथे स्वत: प्रशांत दामलेंनी तिकिट विक्री केली होती. तर आणखी काही व्यवसायिक नाट्य संस्था कोरोना नंतर हळूहळू रंगभूमीवर पाय ठेवताना दिसत आहे. अश्यातच ह्या बातमीमुळे पुढे काय घडेल कुणास ठाऊक.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव