“मी शपथ घेतो की….”, उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई, दि. १८ मे २०२०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यावर कोरोनाचं संकट असल्याने नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रम न घेता विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड, प्रविण दटके, गोपिचंद पडळकर, अमोल मिटकरी, राजेश राठोड यांचा समावेश होता.

कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषी मंत्री दादाजी भुसे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे आदींसह सदस्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा