महिला आमदारा समोर युवकाचे अश्लील चाळे

बिहार, ३ फेब्रुवरी २०२१: भारतात आजून ही आये दिन कुठे ना कुठे मुलीवर, महिलेवर अत्याचार, विनयभंग किंवा अश्लील चाळे करण्याचे कृत घडत आसतात. बिहार मधुन आशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार मधे गुन्हेगारीचे विळखा वाढत आसून आता झालेल्या घटने मधे जनतेचा सेवक अर्थात आमदार महिले समोर अश्लील चाळ्याची घटना घडली आहे.
बिहार मधे एका मतदार संघातील गावात क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन करण्यासाठी महिला आमदाराला बोलवण्यात आले होते. त्यावेळी अशी घटना या महिला आमदाराबरोबर घडली. ज्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली आहे. महिला आमदार व्यासपिठावर आसताना एक तरुण अश्लील चाळे करू लागला.
महिला आमदार व्यासपिठावर आसताना एक तरुण अश्लील चाळे करू लागल्यावर, महिला आमदाराने भरसभेत त्या युवकाच्या कानशिलात लावली. युवकाच्या त्या कृत्यावर महिला आमदार संतापल्या आणि त्यांनी त्या घटनेचा प्रतिकार करत हे पाऊल उचलले. या प्रकरानंतर कार्यक्रमात गोंधळ उडाला. नंतर आमदार घटनास्थळावरून निघून गेल्या.
देशात महिलेवरील आत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामधे सर्व सामान्य जनतेवर असा अन्याय होत होताच. पण, आता जनतेचे सेवक म्हणून  कार्य करणार्या महिला आमदाराबरोबर असे कृत्य झाले. ज्यामुळे महिलेंचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा