हॉकीमध्ये भारताने सिंगापूरचा १६-१ ने केला पराभव, हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांची चांगली कामगिरी

पुणे, २६ सप्टेंबर २०२३ : कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांच्या हॅटट्रिकच्या जोरावर, भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा २०२३ मध्ये आपली शानदार विजयी मालिका सुरू ठेवली आणि सिंगापूरचा १६-१ असा पराभव केला.

पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव करणाऱ्या भारतीय संघासाठी हरमनप्रीतने चार (२४व्या, ३९व्या, ४०व्या, ४२व्या मिनिटाला ), मनदीपने तीन (१२व्या, ३०व्या आणि ५१व्या मिनिटाला ), वरुण कुमारने दोन (५५व्या मिनिटाला) गोल केले. अंतिम फेरीत अभिषेकने दोन (५१वे आणि ५२वे) तर व्हीएस प्रसाद (२३वें), गुरजंत सिंग (२२वे), ललित उपाध्याय (१६वे ), शमशेर सिंग ( ३८वे) आणि मनप्रीत सिंग (३७ वे) यांनी गोल केले.

सिंगापूरकडून एकमेव गोल मोहम्मद झाकी बिन झुल्करनैनने केला. जागतिक क्रमवारीत सिंगापूर ४९व्या स्थानावर असल्याने टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतासाठी पुन्हा एकदा हा सामना एकतर्फी ठरला. भारताला आता २८ सप्टेंबर रोजी पूल ए च्या पुढील साखळी सामन्यात जपानशी खेळायचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा