भारतात बिहार, उत्तर प्रदेश राज्य कोरोना आकडेवारी लपवण्यात अव्वल……

नवी दिल्ली, २८ जुलै २०२०: देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या १४ लाखाच्या पार गेली आहे तर नागरिक या महामारी मुळे अजूनही दहशतीमधे आहेत. त्यात देशातील अनेक राज्यांचा भोंगळ कारभार देखील समोर येत आहे. अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हि लपवली जात असून तिथे लोकांना आंधारात ठेवले जात आहे. भारतातील कोरोनाच्या या स्थितीचा आभ्यास अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे.

बिहार, उत्तर प्रदेशची वाईट कामगिरी……

बिहार आणि उत्तर प्रदेश राज्य हे कोरोना लपवण्याच्या बाबतीत देशात पहीले असल्याचे अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापिठाने आपल्या अहवालात म्हंटले आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश राज्याची कामगिरी हि सर्वात वाईट असून त्यांनी आकड्याच्या बाबतीत फार निष्काळजीपणाने काम केले असे ते म्हणाले.

“मेडरिव्सिव” या आरोग्यसंदर्भातील ऑनलाईन प्रकाशनामधे आभ्यास….

“मेडरिव्सिव” या आरोग्यसंदर्भातील ऑनलाईन प्रकाशनामधे भारतातील कोरोना आकडेवारीच्या आभ्यासचे पुर्ण संशोधन मांडण्यात आले आगे. तसेच भारतातील राज्यांनी कशा प्रकारे कोरोना बाबतीत कामगिरी केली त्याचे संकलन करण्यात आले. तसेच अमेरिकेतील संशोधकांनी देशातील कोरोनाचा आभ्यास करुन हे निकष समोर मांडले.

कर्नाटक सरकारचे उत्तम कार्य….

या संशोधनातून महत्वाची माहिती समोर आली असून या मधे कर्नाटक सरकारने उत्तम कार्य केले असल्याने त्या राज्याचे भरभरून कौतुक करण्यात आले. कोरोना संदर्भातील योग्य ती आकडेवारी ठेवण्यात ते सक्षम असल्याचे संशोधकांनी म्हटले आणि तसे आभ्यासत नमूद देखील केले.

आमच्या आभ्यासामध्ये भारतातील विविध राज्यांनी सादर केलेल्या आकडेवारी मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकाचा सीडीआरएस हा ०.६१ आहे तर बिहार, उत्तर प्रदेशचा ०.० आसून भारताचा हा सरारसरी सीडीआरएस ०.२६ आसल्याचे संशोधकांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा