मुंबई, दि. ५ मे २०२० : देशात गेल्या चोवीस तासात आतापर्यंत सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि नवीन प्रकरणे समोर आली आहेत. देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढून ४६,००० च्या पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. आतापर्यंतच्या आकड्यांनुसार देशामध्ये एकूण १,५६८ लोकांचा मृत्यू झाला आहे तर संक्रमित लोकांची संख्या ४६,४३३ वर पोचली आहे.
केवळ गेल्या चोवीस तासांमध्ये देशांमध्ये ३,९०० नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि त्याचबरोबर १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी २४ तासांच्या तुलनेत आत्तापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. याआधी चोवीस तासांमध्ये सर्वात जास्त रुग्ण दगावण्याचा आकडा ८३ एवढा होता.
असे असले तरीही यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत १२,७२७ रुग्ण ठीक झाले आहेत. रुग्ण नीट होण्याची टक्केवारी सातत्याने वाढत आहे आणि ती २७.४० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. राज्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर राज्यात सोमवारी ७७१ नवे करोनाबाधित सापडले होते. राज्यात आतापर्यंत २४६५ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी