राजगुरूनगर शहरात कोरोना सर्व्हे करणाऱ्या महिलाच आजारी

राजगुरूनगर, १८ सप्टेंबर २०२० :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत राजगुरूनगर शहरात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत असताना तपासणी करणारी महिलाच आजारी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या महिलेने वरिष्ठांना पूर्व कल्पना देऊनही या अाशा वर्करला सर्व्हेसाठी पाठविण्यात आले आहे. पहिल्या दिवशीच सर्व्हे बंद पडायला नको अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षण करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात व नगरपरिषद क्षेत्रात हा सर्व्हे सध्या करण्यात येत आहे. मात्र सर्व्हे करणाऱ्या व्यक्तीच जर आजारी असतील तर कोरोना रोखणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सर्व्हे करणाऱ्या व्यक्तीला देण्यात आलेले हॅन्डग्लोजही कमी दर्जाचे असून ते फाटत आहेत. त्याच सोबत सॅनिटायझरची एक छोटी बाटली दिली आहे. या गोष्टीचा नक्की वापर कसा करायचा असाही सवाल गेली सहा महिने कोरोनाच्या लढ्यात झोकून काम करणाऱ्या या अाशा वर्कर करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – सुनील थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा