सांगली,२ डिसेंबर२०२२: कुपवाडयेथे एक पूर्ण वाढ झालेले सांबर दाखल झाल्याने एकच खळखळ उडाली आहे. घटनास्थळी वन विभाग आणि पोलीस दाखल झाले असून सांबराला रेस्क्यू करण्याचे काम सुरु आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुपवाड ते मिरज रस्त्यावर एका ठिकाणी पूर्ण वाढ झालेला सांबर काही नागरिकांना दिसून आले आणि संपूर्ण गावात सांबर दिसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस दाखल झाले असून सांबराला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू मोकळ्या जागेमध्ये सांबर सैरभैर पळत असल्याने सांबराला रेस्क्यू करण्यामध्ये अडचणी येत आहेत. दरम्यान, सांबर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर