शोपियानमध्ये सुरक्षा दलांना पुन्हा मोठे यश, एलईटीच्या दोन दहशतवादी साथीदारांना केली अटक

जम्मू-काश्मीर, १० मे २०२३: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात गुंतलेल्या सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोपियानमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. या दोघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूगोळा, शस्त्रे आणि आयईडी जप्त केले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरक्षा दलांसोबत संयुक्त कारवाई करत दोन्ही दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे.

शाहिद अहमद लोन आणि वसीम अहमद गनी अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही शोपियांचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून १ पिस्तूल, ४ पिस्तुल राऊंड, १ सायलेन्सर, १ आयईडी, १ रिमोट कंट्रोल, २ बॅटर्‍या व एके ४७ रायफलचे १ रिकाम्या मॅगझिनसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांविरोधात सतत मोहीम राबवत आहेत. नुकतेच राजौरी येथे एक मोठे ऑपरेशनही करण्यात आले होते ज्यात एक दहशतवादी मारला गेला होता. मात्र, यादरम्यान दहशतवादी हल्ल्यात ५ जवानही शहीद झाले. प्रत्यक्षात या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू केली.

शोध मोहिमेदरम्यानच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला होता ज्यात ५ जवान शहीद झाले होते. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही राजौरी येथे पोहोचले. आणि त्यावेळी त्यांनी जवानांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहनही दिले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा