मोदी सरकारच्या ९ वर्षांमध्ये भारत ग्राहक, विमान वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रात जागतिक आघाडीवर

पुणे, ३१ मे २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा भारतातील कार्यकाळ अतुलनीय राहिला आहे. ज्या भागात भारत आयातदार आणि ग्राहक होता त्या भागात भारताचा विकास आश्चर्यकारक झाला आहे. भारत हा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे. देश तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे. कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा देश आहे. ते तिची रिफायनरी क्षमता वार्षिक २५० दशलक्ष टनांवरून ४५० दशलक्ष टन करण्याकडे वाटचाल करत आहे.

भारतातील गॅस पाइपलाइन नेटवर्क लवकरच २२ हजार किमीवरून ३५ हजार किमीपर्यंत विस्तारणार आहे. नवीकरणीय ऊर्जेबाबत बोलायचे झाले तर आज भारत हा जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम असलेला देश बनला आहे. भारतात ९७ हजारांहून अधिक स्टार्ट अप सुरू झाले आहेत. यापैकी १०० युनिकॉर्न आहेत. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन देशाला एक नवी उंची देत आहे. १८ हजार कोटींची पीएलआय योजना इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरीच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे. २०२३ – २४ मध्ये १० लाख कोटी खर्च करून ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि रस्ते यांच्याशी संबंधित प्रकल्पांना चालना दिली जात आहे.

विमान वाहतूक क्षेत्रातील भारताची प्रगतीही लक्षवेधी आहे. या ९ वर्षांत भारतातील विमानतळाचा विकास दुप्पट वेगाने झाला आहे. जिथे दशकभरापूर्वी केवळ ७४ विमानतळ होते, ते आता १४८ पर्यंत वाढले आहेत. १८ सेमी हायस्पीड वंदे भारत गाड्या चालवण्यात आल्या आहेत. मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विस्तार ५ ते २० शहरांपर्यंत वाढला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा