दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर वाढीव उपाययोजना

15

नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर २०२० : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेत दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.

दिल्लीत आरटी–पीटीसी चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याची सूचना शहा यांनी यावेळी केली.कोरोना संसर्गाचा धोका अधिक असलेल्या भागांमध्ये आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांच्या फिरत्या प्रयोगशाळा तैनात केल्या जाणार असल्याचं बैठकीनंतर शहा यांनी ट्विटरवर सांगितलं.तसेच,रुग्णालयांची क्षमताही वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गंभीर रुग्णांसाठीच्या खाटांची संख्याही वाढवण्यास सांगण्यात आले आहे

.दिल्लीतली काही रुग्णालये कोविड उपचारांसाठी समर्पित ठेवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.दिल्लीत लवकरच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी