“हायवोल्टेज” लढतीसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका सज्ज

पुणे २८ सप्टेंबर २०२२: ऑस्ट्रेलियाविरोधात मालिका विजय मिळवलेल्या भारतीय संघाची आज पासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध लढत होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी ट्वेंटी सामना तिरूअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. आज सायंकाळी सात वाजता दोन्ही संघ आमने-सामने येतील. या मैदानावर भारतीय संघ यापूर्वी दोन टी ट्वेंटी सामने खेळला आहे. भारताने एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या सामन्यात पराभवाला समोर जावे लागले आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला या मालिकेचा फायदा होणार असून संघाच्या अनेक पैलूवर काम करता येईल. डेट्स ओवर्स मध्ये आपल्या गोलंदाजी सुधारण्यासाठी संघाला वाव आहे. त्यावर लक्ष केंद्रित करता येईल. दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि मध्य गती वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार ला विश्रांती दिली गेली आहे.

या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरुवातीला तीन मॅचेसची टी ट्वेंटी सिरीज होईल. त्यानंतर वन डे सिरीज खेळली जाणार आहे. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टी ट्वेंटी मॅच भारतीय वेळानुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. मॅच च्या अर्धा तास आधी टॉस होईल.

भारतीय संघ :

रोहित शर्मा ( कर्णधार )के एल राहुल, विराट कोहली सूर्यकुमार यादव , श्रेयस अय्यर , दिनेश कार्तिक , ऋषभ पंत. अक्षर पटेल ,अर्शदिप सिंह , उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर , जसप्रीत बुमरा , शहाबाद अहमद

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा