भुवनेश्वर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, आरएसएस एखाद्या विशिष्ट समाजाचा विरोध करत नाही. ओडिशातील भुवनेश्वरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “भारत हिंदूंचा देश आहे, त्यामुळे सर्व धर्म येथे सुरक्षित आहेत. जगातील सर्वात सुखी मुस्लिम भारतात आहे. पारशी आणि यहूदी धर्मातील लोकही भारतात सुरक्षित आहेत. भाराताला भविष्याकडे घेऊन जाण्याचा संघाचा उद्देश आहे.”
नऊ दिवसांच्या दौऱ्यावर ओडिशामध्ये आलेले मोहन भागवत शनिवारी एका कार्यक्रमात बोल होते. भागवत म्हणाले की, संघ फक्त विशिष्ट समाजाचा आहे, हा डाग संघावरुन निघून गेला पाहीजे, अशी माझी इच्छा आहे. संपूर्ण देश एका तारेने बांधलेला आहे, असेही भागवत म्हणाले.
हिंदू भारतातील नागरिकांचा सांस्कृतीक वारसा पुढे ते म्हणाले की, “भारत हिंदूंचा देश आहे. हिंदू एखाद्या पुजेचे नाव नाहीये. कोण्या भाषेचे नाव नाहीये. एखादे राज्य नाहीये. भारत एका संस्कृतीचे नाव आहे. जी भारतात राहणाऱ्या सर्वांचा सांस्कृतीक वारसा आहे. हा जगातील सर्व धर्मांचा आदर करणारा धर्म आहे. भारतातील लोक वेगळ्या संस्कृती, भाषा, भौगोलिक स्थानातले असूनही स्वतःला एक मानतात. या एकतेमुळे मुस्लमान, पारशी यांसारखे धर्म देशास सुरक्षित आहेत.