उजनी (मा) येथे झालेल्या भुमिगत गटारीच्या निकृष्ठ कामाची चौकशी करावी

माढा (सोलापूर), दि.१९ जुलै २०२०: माढा तालुक्यातील ग्रामपंचायत उजनी (मा) येथील दलित वस्ती सुधारणा योजनेतून झालेल्या भूमिगत गटार योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माढा तालुका विधानसभा कार्याध्यक्ष महादेव भारत साबळे यांनी पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्याकडे दि.२७ फेब्रुवारी २०२० रोजी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून याची त्वरित दखल न घेतल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कुर्डूवाडी येथे अमरण उपोषण करण्याची जाहीर नोटीस प्रशासनास दिली आहे.

त्यांच्या जीवितास काय बरे वाईट झाले तर त्यास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे. १४ वित्त आयोगातून दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत केलेली कामे निकृष्ट असून उजनीच्या ( मा) नागरिकांची अडचणीची ठरत असून योग्य पद्धतीने गटारीची कामे न झाल्याने दलित वस्ती मधील सामान्य नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. भूमिगत गटार योजनेचे चेंबर रस्त्यापासून दोन दोन फूट उंच आहे. रस्त्यावरचे पाणी सामान्य गरीब नागरिकांच्या घरामध्ये जात असून त्या गटार योजनेचा येथील नागरिकांना काही फायदा झालेला नाही.

उलट तेथील नागरिकांच्या घरात पाणी घुसून येथील नागरिकांचे नुकसान होत आहे आशा योजना काय कामाच्या? असा तेथील सामान्य दलित वस्तीमधील नागरिकांमध्ये सवाल उत्पन्न होत आहे. तसेच तेथील समाज मंदिराच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणाबाबत देखील तक्रार आहे. ग्रामपंचायतीने त्या तक्रारीचे निवारण करून येथील नागरिकांची समस्या सोडविणे गरजेचे आहे.

तसेच भूमिगत गटार योजनेच्या पाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने न लावल्याने येथील पाणी काँक्रीट रस्त्यावरती येऊन तेथे शेवाळा तयार झाले असून तो रस्ता शाळकरी मुले व वृद्ध लोकांसाठी जाण्या-येण्याचा असून त्यावरून घसरून एखाद्या शाळकरी मुलगा अथवा वृद्ध जखमी होऊ शकतो. याची दखल उजनी (मा )ग्रामपंचायतने आज पर्यंत घेतली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या हितासाठी भूमिगत गटार योजनेचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊन चांगल्या पद्धतीचे काम करून मिळावे. अन्यथा १५ ऑगस्ट २०२० रोजी पंचायत समिती कुर्डूवाडी येथे अमरण उपोषण करणार असल्याचे महादेव साबळे यांच्या निवेदनात म्हटले आहे.

याची त्वरित दखल घेऊन वरिष्ठ स्तरावरून तात्काळ कार्यवाही व्हावी असे उजनी (मा) येथील सिद्धार्थ नगर येथील नागरिकांची मागणी असून सध्याच्या कोरोना परिस्थितीने योग्य ते सामाजिक अंतर ठेवून शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार १५ ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार असल्याचे महादेव साबळे यांनी आपले निवेदनात नमूद केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा