आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई २८ जून २०२३: सीमाशुल्क, वस्तू आणि सेवा कर चे अतिरिक्त आयुक्त आणि माजी ईडी अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हिरे व्यापाऱ्यांकडून ५०० कोटींपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने आज दुपारी अटक केली.

सचिन सावंत यांनी यापूर्वी फेडरल एजन्सीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयात उपसंचालक म्हणून काम केले होते. ईडीने मंगळवारी त्यांच्या मुंबईतील आणि इतर काही ठिकाणच्या जागेची झडती घेतल्यानंतर, मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या सचिन सावंत हे लखनऊमध्ये कार्यरत होते. न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा