इस्माईल शेख आणि एन.पी. मिसाळ यांना केंद्रीय पदक जाहीर

4

जालना, दि.७ जून २०२०: कदीम जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार शेख ईस्माईल व पोलीस हवालदार एन.पी.मिसाळ यांना सन २०१८-१९ चे केंद्रीय गृहमंत्रीपदक जाहीर झाले आहे.

या संदर्भात अधिक माहीती अशी की, सध्या कदीम जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार शेख ईस्माईल व पो हवालदार .एन.पी .मिसाळ हे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असताना त्यांनी उत्कृष्ट कार्य केले असल्याने या दोघांना केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सन २०१८-१९चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एन.डी चव्हाण(भापोसे), डिवायएसपी सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह अनेकांनी शेख व मिसाळ यांचे अभिनंदन केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा