आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना दरमाह मिळणार ५०० रुपये

कोल्हापूर, २५ सप्टेंबर २०२३: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ मध्ये प्रवेशित प्रशिक्षणार्थींना दरमहा आता ५०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे. ४० वर्षांनंतर कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाने विद्यावेतनात वाढ केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागणार आहे.

आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना १९८३ पासून विद्यावेतन दिले जात आहे. विद्यावेतनात गेल्या काही वर्षांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. यापूर्वी प्रशिक्षणार्थींना ४० ते ६० रुपयांपर्यंतचे विद्यावेतन मिळत होते. वाढती महागाई, शैक्षणिक साहित्याच्या किंमती, वाहतूक खर्चात वाढ, प्रशिक्षणासाठी होणारा खर्च बहुतांश प्रशिक्षणार्थीं सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील विद्यावेतनातून करणे शक्य होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यावेतनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ दोन अपत्यांना मिळू शकणार आहे. हा लाभ दर तीन महिन्यांनी हप्त्याने दिला जाणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींची ८० टक्के उपस्थिती आवश्यक असणार आहे. प्रशिक्षणार्थींच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यावर महा-डीबीटी पोर्टलवरुन विद्यावेतन देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा