Just for Hearts चे तज्ञ आपल्या भेटीस ‘धन्वंतरी’ मध्ये

आरोग्य विषयी आपण कशाप्रकारे काळजी घ्यावी तसेच होणाऱ्या आजारांपासून कसे वाचावे यासाठी न्यूज अनकट आपल्यासाठी घेऊन आले आहे ‘धन्वंतरी’. सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस स १०:३०वा Just for Hearts चे वैद्यकीय तज्ञ आपल्या भेटीला येणार आहेत तेव्हा तुम्ही यांना पाहू शकता Newsuncut.tv वर . कोविड -१९ च्या या काळात आपण कोणती काळजी घ्यायला हवी किंवा कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबाबत सर्व माहिती हे तज्ञ आपल्याला देणार आहेत.

सोमवार

पूजा तौर (योग विशेषतज्ञ): लॉकडाउनच्या काळामध्ये आपण सर्व वर्क फ्रॉम होम करत आहोत. परंतु, वर्क फ्रॉम होम करत असताना आपण एकाच जागी खूप वेळ बसून राहतो व आपली हालचाल देखील खूप कमी होते. परिणामी आपल्याला मणक्याचे, पाठीचे, मानेचे त्रास होण्यास सुरुवात होते. या सर्वांपासून कसे वाचावे याबाबत संपूर्ण माहिती पूजा तौर यांनी सोमवार धन्वंतरीच्या भागामध्ये दिले आहे. हा भाग आपण https://newsuncut.tv/dhanvantari-home-exercise-during-lockdown/ वर पाहू शकता.

बुधवार

डॉ. रवींद्र कुलकर्णी (एमडी, हृदय रोग तज्ञ, संस्थापक, संचालक, जस्ट फॉर हार्ट्स हेल्थकेअरचे सीईओ) : कोविड -१९ पासून आपण स्वतःला कसे वाचवू शकतो तसेच यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागेल याविषयी संपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आपल्याला धन्वंतरी च्या भागामध्ये करणार आहेत.

  • शुक्रवार

दिव्या सांगलीकर (आहार तज्ञ): कोविड -१९ च्या या काळात आपला आहार कसा असावा तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण कोणती काळजी घ्यायला हवी, आहारामध्ये कोणते बदल करायला हवेत याविषयी महत्वपूर्ण पाच सल्ले आपल्याला आहारतज्ञ दिव्या सांगलीकर धन्वंतरीच्या या भागांमध्ये देणार आहेत.

अधिक माहितीसाठी www.justforhearts.org या सांकेतिक स्थळाला भेट द्या

पाहायला विसरु नका सोमवार बुधवार शुक्रवार न्यूज अनकट प्रस्तूत विशेष कार्यक्रम “धन्वतंरी”

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा