प्राचीन भारताचा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा; कैलास मंदिर

Kailasa Temple Ancient Indian Heritage
कैलास मंदिर;

Kailasa Temple Ancient Indian Heritage: जेव्हा ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं, तेव्हा त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय पद्धती भारताला शिकवल्या, असं म्हणतात की भारताच्या विकासासाठी मदत ब्रिटीशांनी केली.
पण तुम्हाला माहिती आहे का, भारताने हजारो वर्षांपूर्वीच अश्या अँडव्हान्स तंत्रज्ञानं आणि वैद्यकीय पद्धती विकसित केल्या होत्या, ज्या आजही जगभरात प्रसिद्ध आहेत आणि वापरल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी ही सर्वात पहिले सुष्रुत नावाच्या एका भारतीय वैद्याने भारतात केली. जी सर्जरी आज साता समुद्रापार जाऊन पोचली आहे. एवढच नाही तर आयुर्वेद, योग आणि इतर भारतीय उपचार पद्धतींनीही जगभरात नाव कमावलं आहे.

आर्किटेक्चरमधील भारताची कमाल: कैलास मंदिर

भारत केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, तर आर्किटेक्चरमध्ये ही कधीच मागे नव्हता. हजारो वर्षांपूर्वी, सुमारे इसवी सन पूर्व २६०० च्या आसपास भारतात अश्या गुहा आणि इमारती बांधल्या गेल्या, ज्या आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानेही बनवणं अशक्य आहे. यापैकीच एक आहे औरंगाबाद, महाराष्ट्रातील वेरूळ लेण्यांनमधले कैलास मंदिर.
हे मंदिर जगातील सर्वात मोठं मोनोलिथिक मंदिर आहे.

मोनोलिथिक म्हणजे काय?

संपूर्ण मंदिर एकाच दगडातून कोरलं गेलं आहे. यात कोणतेच विटांच बांधकाम दिसणार नाही तर आखे मंदिर हे फक्त एका दगडातून कोरले गेले आहे. विशेष म्हणजे, इतर बांधकाम करताना आपण तळापासून वरपर्यंत बांधतो म्हणजे (bottom to top) सर्वात पहिले आपण पाया भक्कम करतो आणि मग पुढचे बांधकाम करतो पण या मंदिराचे बांधकाम हे वरपासून खालपर्यंत म्हणजे (top to bottom) या पद्धतीने झाले आहे.सर्वात पहिले या मंदिराचे शिखर कोरले गेले होते.

कैलास मंदिर कोणी बांधले?

कैलास मंदिर (unesco world heritage sites in india)

असं म्हणतात की कैलास मंदिर हे राष्ट्रकूट राजवंशचा राजा कृष्ण पाहिला याने बांधले आहे. राष्ट्रकूट राजवंशाने ८व्या ते १०व्या शतकात दख्खनच्या मोठ्या भागावर राज्य केलं. त्यांनी बरेच युद्ध जिंकली आणि उत्तर आणि दक्षिण भारतात आपला विस्तार केला. याशिवाय, त्यांनी कला, आर्किटेक्चर आणि साहित्यातही मोठं योगदान दिलं.
आज राष्ट्रकूटांचं नाव फारसं ऐकू येत नसलं, तरी त्यांनी भारतीय इतिहासाला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. कैलास मंदिरासारखी वास्तुशिल्पाची कामं त्यांच्या कलेतील प्रभुत्व दाखवतात.

कैलास मंदिराची वैशिष्ट्यं;

१९८३ मध्ये वेरूळ येथील लेण्यांना UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज साइट ची घोषित केले वेरूळमधे ३२ पेक्षा जास्त गुहा आहेत, आणि त्यातल्या सोळाव्या गुहामधे हे भव्य कैलास मंदिर स्थापित केले आहे. या मंदिराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले कारण. हे मंदिर ३०० फूट लांब, १७५ फूट रुंद आणि ९८ फूट उंच आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन भव्य खांब आहेत, ज्यांच्या तळाशी हत्तींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मूर्ती दाखवतात की, हे मंदिर त्यांच्यावर उभे आहे आणि या मंदिराची रक्षा देखील ते हत्ती करत आहेत. इतकंच नाही तर या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा देखील कोरलेल्या आहेत. मंदिरात पूल, जिने, भुयारी मार्ग आणि वॉटर हार्वेस्टिंग सारखी यंत्रण आहेत. सर्वात रहस्यमी गोष्ट म्हणजे या मंदिरासाठी ४० लाख टन दगडांचे तुकडे काढले गेले, पण ही दगड कुठे गेली याचा आजही पत्ता नाही.

औरंगजेबाचा अयशस्वी प्रयत्न;

तर १६८२ मध्ये औरंगजेबाने १००० कामगारांना तीन वर्षांसाठी कामाला लावलं, या मंदिराला उद्ध्वस्त करण्यासाठी. पण मंदिराच्या अद्भूत रचनेमुळे त्यांचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी झाला. मंदिराच्या मजबूत बांधकामापुढे त्यांचे सगळे प्रयत्न फिके पडले. शेवटी औरंगजेबाने हार मानली, आणि आजही कैलास मंदिर अभिमानाने उभं आहे, जणू त्या शिल्पकारांच्या मेहनतीचं आणि कौशल्याचं प्रतीक बनून. खरंच प्राचीन भारताचा हा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा हा आपल्याला अभिमानाने भरतो. भारताचा प्राचीन वारसा काल, आज आणि उद्याही प्रेरणा देतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे