मुंबई, ९ सप्टेंबर २०२०: नुकतीच कंगना राणावत मुंबई मध्ये पोहोचली आहे. एअरपोर्टच्या बाहेर आरपीआय, भाजप व करणी सेना कंगनाचे समर्थन करण्यासाठी उभे आहेत तर दुसरीकडे शिवसेना, कामगार सेना यांच्याकडून विरोध करण्यात येत आहे. कंगनाने मुंबईचा अपमान केला आहे. त्यामुळे तिला मुंबईत येऊ देणार नाही असं कामगार सेनेचं म्हणणं आहे.
पोलिसांनी देखील पूर्ण कडेकोट बंदोबस्त केला आहे. एअरपोर्टच्या बाहेर व तसेच प्रांगणात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. यासह कंगनाला केंद्राकडून व्हाय सिक्युरिटी देखील देण्यात आली आहे. कंगनाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी पूर्ण घेराव घालण्यात आला आहे. तर शिवसेनेनं काळे झेंडे घेऊन कंगनाचा निषेध करणं सुरू केलं आहे.
यापूर्वी आज सकाळी अकराच्या दरम्यान बीएमसीनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करत बुलडोझर फिरवला होता. याला प्रत्युत्तर देत कंगनानं या प्रकरणाला बाबर व राम मंदिर अशी उपमा दिली होती. यानंतर आता तिच्या फ्लॅटवर देखील कारवाई करण्यात येण्याचं सांगण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे