मुंबई : बॉलिवूडमधील क्वीन कंगना राणौतचा हीचा आगामी बायोपिक चित्रपट ‘थलाइवी’ चा फस्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे.
तमिळमध्ये या चित्रपटाचे नाव ‘थलाइवी’ ठेवण्यात आले आहे. आणि हिंदीमध्ये ‘जया’ असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट तमिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे.
या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.या चित्रपटाचा फस्ट लूक कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल हिने सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे.
दरम्यान, ‘थलाइवी’ चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. यात कंगणाशिवाय साउथचा स्टार अरविंद स्वामीही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.















































