पुणे: कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वाना दिलासा देणारी बातमी काल समोर आली होती. पुण्यात पहिले कोरोना बाधित पती पत्नीचे रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहे. आज पुन्हा सॅम्पल टेस्टिंग एनआयव्हीकडे पाठविले जातील. ते रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आल्यास दोघांना डिचार्ज देऊन घरी सोडले जाणार आहे.
यावर बोलताना ते म्हणाले की करोना’च्या संसर्गाची बाधा इतरांना होऊ नये, यासाठी सरकारने गर्दी करू नका, असे आवाहन केले आहे. त्या आवाहनास आपण पुणेकरांनी प्रतिसाद द्यायला हवा. आली. दुसरीसुद्धा ‘निगेटिव्ह’ येईल, अशी आशा आहे. १५ दिवसांत नायडू रुग्णालयात आमची चांगली काळजी घेण्यात आली. आम्हीसुद्धा डॉक्टरांचे नियम पाळले. आता पुणेकरांनीसुद्धा गर्दी न करता आपण कोणा संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोणाची लागण होणार नाही, याची काळजी घ्या,’ अशा शब्दांत त्या दाम्पत्याने पुणेकरांना आवाहन केले आहे.
आजही आपल्या शहरातील रुग्णांची संख्या वाढत असून, ती चिंताजनक आहे. सरकार उपाययोजना करीत आहे. त्यांना आपण नियम पाळून सहकार्य करू या. आम्ही काळजी घेतली, आता तुम्ही काळजी घ्या…’ असे कळकळीचे आवाहन ‘करोना’मुक्त रुग्णाने पुणेकरांना केले. डॉक्टरांनी घालून दिलेले नियम, उपचार आम्ही पूर्णपणे पाळले. आता आम्ही पूर्ण ठणठणीत बरे झालो आहोत.
आता आमची १५ दिवसांनंतरची पहिली चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे. दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळी घरी जाणार आहोत. आपल्याला काहीही होणार नाही, हा अतिआत्मविश्वास बाळगू नका. अतिविश्वासामुळे जीवाला धोका आहे. आमच्यासोबत असलेले अन्य प्रवासी बरे आहेत. आज, बुधवारी आणि उद्या, गुरुवारी दिवसांत पाच जणांना घरी सोडले जाईल. त्यानंतर आणखी आमच्या सहलीत असलेल्या ११ जणांना दोन-तीन दिवसांच्या फरकाने सोडले जाईल. आमच्याबरोबरच इतरही बरे झाले आहेत. ‘करोना’च्या आजारातून आपण बरे होऊ शकतो, हा विश्वास आम्हाला आहे, असेही त्या रुग्णाने सांगितले.