पुणे, २८ सप्टेंबर २०२२: बावधन भूगाव(ता. मुळशी) येथे सार्वजनिक जागेवर बेफिकीरपणे कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायत आता करडी नजर ठेवणार असून कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. संपुर्ण गावात ग्रामस्वच्छता अभीयान राबवून ग्रामपंचायतीने सात ट्राॅली कचरा गोळा केला.
भुगावमध्ये घरगुती कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने घंटागाडी ची सोय केली आहे. पंरतु फ्लॅटमध्ये राहणारे नागरिक पुण्याच्या नोकरीसाठी निघताना घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरतात. चालत्या गाडीतून कचऱ्याची पिशवी रस्त्याच्या कडेला फेकतात. त्यामुळे कचऱ्याचा ढीग साचला की ग्रामपंचायत ती उचलून नेते. भटकी कुत्री, जनावरे, वेगवेगळे पक्षी हा कचरा इतत्रत पसरवितात. कचऱ्याच्या घाणीमुळे संसर्ग
आजाराचाही फैलाव होवू लागला आहे.
याबाबत घेतलेल्या बैठकीत सरपंच वनिता तांगडे, उपसंरपंच संकेत कांबळे, माजी सरपंच निकीता सणस, माजी उपसरपंच राहुल शेंडशे, सुरेखा शेंडगे, अर्चना सुर्वे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
गावात २ ऑक्टोबर पर्यंत ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. आभियानाचा प्रारंभ करताना पहिल्याच दिवसी सात ट्रॅली कचरा सार्वजनिक ठिकाणीहून गोळा करण्यात आला.
गावात सार्वजनिक ठिकाणीचा कचरा दररोज गोळा केला जातो. तरीही लोक पुन्हा कचरा टाकतात. त्यामुळे डास, कीटक, चिलटे, माश्या याची उत्पती वाढते. मानवाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने ही मोहीम हाती घेतली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रकाश जगताप