आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी क्रांती चौक परिसरात शिवप्रेमी दाखल…!

औरंगाबाद, १९ फेब्रुवारी २०२३ : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील क्रांती चौक परिसरात मोठ्या संख्येने शिवप्रेमी दाखल झाले आहेत. यावेळी शिवप्रेमींकडून ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे; तसेच ढोल-ताशा पथकाने क्रांती चौक परिसरामध्ये ढोल-ताशा पथकाचे पथसंंचलनही करण्यात येत आहे. आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी क्रांती चौक परिसरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी दाखल होत आहेत.

शासकीय परिपत्रकानुसार ‘जय जय महराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने हे राज्यगीत शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर गायन करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले होते. त्याप्रमाणे ‘जय जय महराष्ट्र माझा’ या गीताचे सामुदायिक गायन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त राज्यभरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवप्रतिमेची मिरवणूक, व्याख्यानासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन शहरातील विविध भागांमध्ये करण्यात आले आहे. शहरातील विविध चौकांतून वाहन रॅली काढण्यात आली. सर्व पक्षांतर्फे उभारण्यात आलेल्या स्टेजवर शिवाजी महाराजांचा पुतळ्याला शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात येत आहे. शिवशक्ती-भीमशक्ती फाउंडेशनतर्फे क्रांती चौक येथे शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखावा ठेवण्यात आला आहे. शहरातील मोठ्या संख्येने शिवभक्त, भाविक तरुण-तरुणी क्रांती चौक परिसरामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी दाखल झाले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा