गोल पोस्ट कृषी रत्नागिरीत खरीपात भाताला मिळणार ६० हजारांचे कर्ज

रत्नागिरीत खरीपात भाताला मिळणार ६० हजारांचे कर्ज

रत्नागिरी, ७ जून २०२३: खरीप हंगामातील अल्पमुदतीच्या शेतीसाठी कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भातासाठी ६० हजार रुपये हेक्टरी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संकरित भातासाठी ६५ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर नाचणीसाठी २० हजार रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीच्या सभेत खेळते भांडवली पीककर्ज दर निश्चित करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे त्यासाठी कर्जांची रक्कम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असून, त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

बागायतीमध्ये आंबा, काजू, सुपारी, चिकू, कोकम, कागदी लिंबू, पेरु, पंपई, आवळा, केळी, काळीमिरी, आले, अननसासाठी कर्ज उपलब्ध करून दिली जाते. आंब्यासाठी हेक्टरी सर्वाधिक दोन लाख वीस हजार रुपये, तर काजूसाठी एक लाख साठ हजार रुपये कर्ज निश्चित करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बॅकेतर्फे शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version