दैनंदिन जीवनात विविध कारणास्तव कित्येक वेळा आपला सामना खोटं बोलणाऱ्या लोकांशी होत असतो. त्यांच्या अशा वागण्याने आपल्याला अनेकदा मनस्ताप होतो. पण पर्याय नसल्याने आपण विषय डावलतो. एक लक्षात घ्या, खोटं पकडणं इतकं सोप नसलं तरी प्रयत्न केला तर तितकं अवघडं पण नाही.
अमेरिका सेनेतील एफबीआयचे विशेष एजंट डेव्हिड चावेज यांनी एका समारोहात म्हटले होते की, लोकांचा चेहरा, देहबोली, हावभाव आणि बोलण्याच्या स्टाईलवरून आपण अनुमान लावू शकतो की, तो खोटं बोलतोय की नाही? यावेळी त्यांनी काही सवयीही सांगितल्या. त्यावर एक नजर…
● खोटं बोलणारे व्यक्ती काही ठराविक शब्दांचा वापर पुन्हा-पुन्हा करतात.
● खोटं बोलणारे लोक ते इमानदार आहेत हे सिद्ध करण्यावर भर देत असतात. ‘तुला खरं सांगतो’, ‘प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर’, ‘शप्पथ घेऊन सांगतो’ अशा वाक्यांचा वापर करण्यावर जोर देतात.
● असे लोक त्यांचे म्हणणे सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न करतात. जिथं थोडं बोलण्याची आवश्यकता असते तिथे सुद्धा सविस्तर विवरण सांगत बसतात.
● असे लोक प्रत्येक गोष्टीला कारणं देणं यातच धन्यता समजतात. जे घडलंय त्यापेक्षा वेगळं काही तरी सांगून पळण्याचा प्रयत्न करतात.
● तसेच खोटारडे लोक थोडं तणावात असल्याने बहुतेकवेळा आपल्या पापण्या सारख्या उघडझाक करत असतात. कमी वेळात ते जास्त वेळा पापणी झपकतात.
● तसेच कधी-कधी ते डोळयात डोळे घालून बोलतात. साधी पापणीही झपकत नाही. जे अस्वाभाविक असेच आहे.
● अशा लोकांना एक गोष्ट दोनदा विशिष्ट कालावधीनंतर विचारले असता, दोन्हींमध्ये थोडीफार तरी तफावत जाणवते.