टॉप 10 ‘ब्रँड व्हॅल्यू’ असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश

जगातील सर्वात मुल्यवान देशांच्या ब्रँडमध्ये भारताने दोन स्थानांनी झेप घेतली आहे. 
 
 या यादीमध्ये टॉप टेनमध्ये भारताचा समावेश झाला असून देशाची ब्रँड व्हॅल्यू 18 टक्क्यांनी वाढली आहे. भारताची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 181 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. 
 
 जगातील ब्रँड फायनान्सकडून ही यादी तयार करण्यात आली असून यामध्ये अमेरिकेनं पहिला क्रमांक पटकावला आहे.
 
▪ 1.अमेरिका : 1970 लाख कोटी 
▪ 2. चीन : 1383 लाख कोटी 
▪ 3.जर्मनी : 344 लाख कोटी 
▪ 4. जपान : 321 लाख कोटी 
▪ 5. युनायटेड किंगडम : 273 लाख कोटी
 
  आगामी पाच वर्षांत देशातील सर्व ब्रँडच्या उत्पादनांच्या विक्रीच्या अंदाजावर देशाची ब्रँड व्हॅल्यू काढली जाते. देशाच्या जीडीपीला एकूण देशाचं उत्पन्न म्हणून गृहीत धरलं जातं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा