‘यारी’ मराठी चित्रपटासाठी ऑडिशन, होतकरू कलाकारांची स्वप्न साकार करणार -किरण ढमाले.

14

पुणे २२ जानेवारी २०२४ : किरण ढमाले प्रोडक्शन प्रस्तुत ‘यारी’ या मराठी चित्रपटासाठी दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे ऑडिशन घेण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन सागडे, निर्माते किरण ढमाले, सहनिर्माते प्रकाश लांडे, डीओपी समीर सोनवणे, संकलक प्रीतम तुंगे, तसेच विपुल रयाल, आकाश कारभारी, कारण जर्तोलिया हे उपस्थित होते. या ऑडिशनमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकार आले होते.

यादरम्यान निर्माते किरण ढमाले यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, नवीन कलाकारांच्या कलागुणांना मराठी चित्रपटात संधी देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील आणि त्यासाठी या ऑडिशन मध्ये आलेल्या कलाकारांचे त्यांनी मनापासून आभार मानले. चेतन सागडे यांचा हा दिग्दर्शक म्हणून पाचवा चित्रपट असणार आहे. नवीन कलाकारांसोबत काम करू इच्छित असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितले. त्या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यात चालू होणार असल्याचेही त्यांनी संगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर