कोकण आपल्याला पुन्हा उभं करायचं : युवक क्रांती दल

पुणे, दि. २३ जून २०२०: काही दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण परिसराला मोठा फटका बसला आहे . वादळग्रस्त भागातील घरांचे पत्रे उडून गेले. फळबागा उद्धवस्त झाल्या, विजेचे खांब आणि ट्रान्स्फॉर्मर कोसळले आहेत . कोरोनाच्या भीतीमुळे कोकणवासीयांना बाहेरून मदत मिळाली नाही. सध्या कोकणी माणूस दुहेरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर ‘युवक क्रांती दल’ आणि ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ यांच्याकडून सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे.

रायगड, अलिबाग, दापोली, तळा, माणगांव, श्रीवर्धन, मुळशी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण वादळग्रस्त भागातील आदिवासी, मजूर, कष्टकरी लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवणे गरजेचे आहे. सांगली व कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरावेळी आपण जशी मदत केली, तशीच मदत आता महाराष्ट्रातील सर्व बांधवांनी ‘कोकण वाचवा’ या मोहिमेसाठी करावी; असे आवाहन पुणे शहर युक्रांदचे अध्यक्ष सचिन पांडुळे यांनी केले आहे.

वस्तू स्वरूपातील मदत गांधीभवन, कोथरूड पुणे (४११०८३) या पत्त्यावर स्वीकारली जाणार असल्याचे पांडुळे यांनी सांगितले. तसेच वस्तू किंवा आर्थिक स्वरुपातील शक्य ती मदत करण्याचे आवाहन देखील दिले-
सिमेंट पत्रा – ७०० ₹
ताडपत्री – ५०० ₹
किराणा सामान किट – ३०० ₹
इतर गरजेच्या वस्तू लोखंडी पत्रे, लोखंडी पाईप, टॉर्च, मेणबत्ती.

आर्थिक मदतीचे आवाहन:

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
स्टेट बँक ऑफ इंडिया
कोथरूड शाखा
कोथरूड, पुणे – ३८
Account no. 52019302096
IFSC Code SBIN0020734

चेक (धनादेश) द्यायचा झाल्यास तो ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या नावाने द्यावा. देणगीची पावती पाठवली जाईल.

संपर्कासाठी

सचिन पांडुळे
९०९६३१३०२२
सुदर्शन चखाले
७८८७६३०६१५
सचिन चौहान
९६३७४२८८८८

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा