मुंबई, २० सप्टेंबर २०२०: मेगास्टार अमिताभ बच्चन दोन दशकांहून अधिक काळ ‘कोन बनेगा करोडपती, शो’चा भाग आहेत. प्रत्येक वेळी या कार्यक्रमाला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळतं. हा कार्यक्रम टीआरपीच्या यादीतही अव्वल आहे. आता शो’चा १२ वा सीझन लवकरच येणार आहे. शो’चं प्रसारण कधी होणार याची अधिकृत घोषणा त्यांनी केलीय.
२८ सप्टेंबरपासून सुरू होणार कोन बनेगा करोडपती
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा प्रीमियर २८ सप्टेंबरला होणार आहे. शो’चा प्रोमो रिलीज झाला आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित होईल. शो’चा प्रोमो सोनी टीव्ही’नं शेअर केलाय. प्रोमो लिहिताना, लिहिलंय की ‘आदर, अदब, अभिनंदन, आभार, केबीसी १२ सुरू होत आहे, २८ सप्टेंबर रोजी शुक्रवार रात्री ९ वाजता’. प्रोमो व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन उत्साहात दिसत आहेत.
अमिताभ बच्चन आजकाल शो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ते सेटमधून सतत फोटो शेअर करत असतात. तसेच सेटवर काम कसं चालू आहे हे सांगत असतात.
यादरम्यान सुरक्षेची पूर्ण तयारी देखील केली गेलीय. अशी माहिती आहे की, कौन बनेगा करोडपतीची नोंदणी व ऑडिशन लॉकडाऊन दरम्यान करण्यात आलं होतं. यावेळी सर्व काही कोरोना विषाणूमुळं ऑनलाइन झालं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे