क्यार चक्रीवादळ ओमान च्या दिशेने मार्गस्थ

कोकण किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात आलेले क्यार चक्री वादळ आणती तीव्र झाले आहे. तीव्रता वाढताच हे वादळ किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकू लागले आहे. अरबी समुद्रापासून ओमान च्या दिशेने जात असलेले वादळ बाष्प ही उडवून नेणार असल्याने राज्यात पाऊस कमी होणार आहे. आज २७ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्र गुजरात कर्नाटक किनारपट्टीलगत समुद्राला असलेले उधाण कायम राहण्याची शक्यता आहे. क्यार चक्रीवादळ काल २६ ऑक्टोबर रोजी साडेआठ वाजता रत्नागिरीपासून तीनशे किलोमीटर, मुंबईपासून ३७० किलोमीटर दूर अरबी समुद्रात ताशी १३० ते १५० किलोमीटर वेगाने धावत होते तर या वादळाचे केंद्र ताशी १२ किलोमीटर वेगाने होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा