केरळच्या इडुक्की येथे दरड कोसळल्यामुळे ५ लोकांचा मृत्यू

इडुक्की, केरळ ,७ ऑगस्ट ,२०२० : केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील राजमाला भागात शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच पोलिसांच्या सांगण्यानुसार या भूस्खलनातून १० लोकांना वाचवण्यात त्यांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक इडुक्की म्हणाले की,” चहा लागवड कामगार राहत असलेल्या ठिकाणी भूस्खलन झाले. तेथे किमान तीन कुटुंबे अडकली आहेत”.

तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, “राजमाला मधील भूस्खलनग्रस्तांना वाचवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद फोर्स (एनडीआरएफ) तैनात करण्यात आले आहे . तसेच पोलिस, अग्निशामक, वन आणि महसूल अधिकाऱ्यांना ही बचाव कार्य अधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”.असं केरळचे मुख्यमंत्री म्हणाले पिनाराई विजयन म्हणाले.

मुख्यमंत्री कार्यालयाने राजमलाला बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर सेवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाशी संपर्क साधला आहे. लवकरच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. केरळच्या बर्‍याच भागात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन सुरू झाले असून त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागात प्रचंड कहर निर्माण झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) बुधवारी इडुक्की, वायनाड आणि कोझिकोड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा