भाजपच्या सदस्यांनी बोकडच्या मटणावर ताव मारुन रामाच्या प्रतिमेचे केले पुजन…

गोंदूर (धुळे), ७ ऑगस्ट २०२०: सियांवर रामचंद्र की जय, प्रभू राम चंद्र की जय, जय श्री राम, अश्या घोषणेंनी महारष्ट्रासह संपुर्ण भारत हा ५ ऑगस्ट रोजी राम जन्मभूमिपुजन सोहळ्याची दिवाळी साजरी केली. या सोहळ्या निमित्त महाराष्ट्रात देखील विविध ठिकाणी अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पण, या सर्वात एक धक्कादायक आणि अनुचित बाब समोर आल्याचे बघायला मिळाले.

श्रावण महिना सुरु आहे. गोंदूर धुळे येथील जिल्हा परिषदेवर बहुमताने भाजपची सत्ता आहे. यात काही सदस्यांनी विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी स्वादिष्ट मटणावर ताव मारला. आता तुम्हाला “त्यात काय मग” असे वाटत आसेल पण मटणावर तावच मारला नाही तर त्यानंतर श्री रामाच्या प्रतिमेच पुजन देखील केलं आणि तेही राम जन्मभूमिपुजनांच्याच दिवशी.

काय आहे प्रकरण…

अनेक वर्षांपासून सभेपूर्वी जेवणावळीचा प्रघात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती हे वैयक्तीक खर्चातून रोटेशन पद्‌धतीने जेवणाची मेजवानी देतात. त्याच्याशी जिल्हा परिषद प्रशासनाचा काहीही संबंध नसतो. काही सदस्यांनी श्रावणामुळे शाकाहार पसंत केले तर मग बाकिच्यांनी झणझणीत मटणाला पंसती दिली. यानंतर सभा झाली. ती भाजपच्या विरोधक सदस्यांकडून झालेल्या आरोपांमुळे गाजली सुद्धा.

एकीकडे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करत देशाला संबोधित करत होते आणि आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगत होते. तर त्याचवेळी जिल्हा परिषद सभास्थळी बोकडच्या मटणावर ताव मारुन तृप्तीचे ढेकर देण्याचे कार्यक्रम सुरू होता. सभेपूर्वी मटणावर ताव, त्या नंतर सभा आटोपल्यावर श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन या सदस्यांनी केले.

हा सर्व प्रकार शिवारातील साई लक्ष्मी लॉन्समध्ये घडला त्या बरोबरच या कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. तुषार रंधे अध्यक्षस्थानी होते. सीईओ वान्मती सी., उपाध्यक्षा कुसुम निकम, सभापती रामकृष्ण खलाणे, मंगला पाटील, मोगरा पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी व्यासपीठावर होते.

शहरात संतापाची लाट, केला जातोय तीव्र निषेध….

हा प्रकार सायंकाळनंतर शहरासह जिल्ह्यात पसरल्यावर “त्या” मांसाहारी सदस्यांविरुद्ध टीकेची झोड उठली. तसेच संताप व्यक्त झाला. शिवसेनेसह भाजपच्या ही इतर विरोधकांनी सोशल मीडियावर या प्रकाराचा तीव्र निषेध केला. तर लोकांनी देखील यावर संतापाची लाट उसळली आहे.

ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. त्याच गडावर आणि त्यांच्याच पक्षातील काहीं सदस्यांनी आसे कृत केले आहे. तर आता नेहमीच कट्टर पद्धतीने हिंदुत्वाचा पक्ष आसलेला भाजप या प्रकरणावर काय निर्णय घेतो ते आजुनही गुलदस्त्यात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा