पुणे ९ फेब्रुवारी २०२५: शहर विकास आणि आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत असले, तरी शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ‘रस्ता कमी आणि खड्डे जास्त’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
शहरातील अनेक रस्त्यांची कामे अनेक दिवसांपासून रखडली आहेत. प्रशासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केले असले, तरी कामे मात्र कछुआगतीने सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. रोजच्या प्रवासात वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.


“प्रशासन फक्त योजना जाहीर करते, पण त्यांची अंमलबजावणी कुठे दिसते?” असा सवाल एका स्थानिक नागरिकाने विचारला. रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक आता सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत.
पुणेकरांचा वाढता रोष पाहता, प्रशासनाने तातडीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा, नागरिकांचा संयम तुटल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी :सोनाली तांबे