क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी

लातूर ४ जानेवारी २०२४ : लातूर जिल्हा वकील मंडळातील महीला विधीज्ञ कक्षात, अध्यक्ष ॲड. महेश बामणकर आणि ॲड. अण्णाराव पाटील यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दिपाने, धुपाने पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ॲड.इरफान शेख, सचिव ॲड.प्रदिपसिंह गंगणे, ॲड.चामे, ॲड.राजेंद्र लातूरकर यांनी समुचित भाषणे केली. यावेळी ग्रंथालय सचिव ॲड.संतोष सोनी, कोषाध्यक्ष ॲड.अमोल पोतदार, ॲड.अश्विन जाधव, ॲड.सलिम डावकरे, ॲड.सचिन बावगे, ॲड.वसुधा फड, ॲड.मेघा पाटणकर, ॲड.सुनंदा मोटे इंगळे,ॲड.नयना देवताळकार, ॲड.यशवंत चव्हाण, ॲड.प्रतिभा कुलकर्णी, ॲड.गायत्री नल्लें, ॲड.सचिन कांबळे आदी महीला विधीज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा