बाॅब-प्रायमन इंटरनॅशनल शाळेमध्ये ग्रंथालय आणि अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन

चांदखेड, पुणे १६ ऑगस्ट २०२३ : आज सकाळी बाॅब प्रायमन इंटरनॅशनल स्कूल, चांदखेड या शाळांमध्ये ग्रंथालय आणि अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय माळी माजी सरपंच चांदखेड तसेच पीएसआय माधूरी कर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी शाळेने सर्वांसाठी ग्रंथालय उपलब्ध केले आहे. तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन आणि अभ्यासिका सुरू केली आहे. यांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाळेकडून सांगण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला कांबळे, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक यांच्यासह सोबतच चांदखेड गावातील ग्रामस्थ सौ.रुपाली धैर्यशील गायकवाड, सौ.रुपाली संजय गायकवाड, सौ.कविता बांदल, सौ.सारीका माळी, श्री.संतोष बनकर यांची उपस्थिती होती. शाळेतील ग्रंथालयात सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असून ती सर्व वयोगटासाठी उपलब्ध आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा