प्रभू श्री रामचंद्र हे नेपाळी, भारतातील आयोध्या खोटी

काठमांडू, दि. १४ जुलै २०२०: प्रभू श्री रामचंद्र हे नेपाळी असून भारतातील आयोध्या ही खोटी असून बनवाटी असल्याचा आरोप नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी केला आहे. सातत्याने नेपाळचे नेते आणि पंतप्रधान हे भारतावर निशाणा साधत आहेत तर काही दिवसापुर्वी भारताचे सर्व वृताकंन करणा-या वाहिन्या बंद करण्याचा निर्णय तेथील केबल ऑपरेर्टसने घेतला होता. तर याधी भारतातून येणारे कोरोनाचे संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हणत टिका केली होती.

भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत असं वक्तव्य ओली यांनी केलं आहे. तसेच आपल्याला पंतप्रधान पदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहे. असेही ओली यांनी म्हटले आहे.

कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा