BGMI आणि Free Fire शी स्पर्धा करण्यासाठी येत आहे हा मेड इन इंडिया बॅटल रॉयल गेम

पुणे, 30 जानेवारी 2022: भारतात PUBG मोबाईलवर बंदी घातल्यानंतर बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) सादर करण्यात आली. BGMI आणि Garena Free Fire हे भारतातील लोकप्रिय बॅटल रॉयल गेम्स आहेत. भारतीय गेमिंग मार्केटवर त्यांचं वर्चस्व आहे.

आता या दोन खेळांना टक्कर देण्यासाठी देशी बॅटल रॉयल गेमची तयारी केली जात आहे. पुणेस्थित गेम स्टुडिओ सुपरगेमिंगने बॅटल रॉयल मोबाइल गेमिंग उद्योगात प्रवेश करण्याची घोषणा केलीय. या मूळं बॅटल रॉयल गेमचं नाव Indus Battle Royale असंल.

तथापि, कंपनीने गेमच्या लॉन्च तारखेबद्दल सांगितलं नाही. याबद्दल फक्त एवढीच माहिती देण्यात आलीय की हा गेम 2022 मध्ये म्हणजेच या वर्षी सादर केला जाईल. सुपरगेमिंग सध्या MaskGun आणि Silly Royale गेम्स ऑफर करत आहोत.

ही गेम सोशल आणि मल्टीप्लेयर्स इंटरेक्शन वर लक्ष केंद्रित करते. आगामी Indus Battle Royale साठी याने ब्रांड न्यू टेक प्लेटफॉर्म तयार केलाय. लॉन्चिंग नंतरही Indus ला सपोर्ट दिला जाईल. यासाठी SuperGamingने एक डेडिकेटेड वेबसाइटही तयार केलीय.

वेबसाईटवर असं सांगण्यात आलं आहे की, Indus हा जगासाठी मेड-इन-इंडिया बॅटल रॉयल गेम असेल. ही गेम मोबाईल, पीसी आणि कन्सोलसाठी उपलब्ध केली जाईल.

Indus Battle Royale भारतीय संस्कृतीवर अधिक भर देणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. यामध्ये जगभरातील गेमर्ससाठी फ्युचरिस्टिक ट्विस्ट देण्यात येणार आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, याला मॉडर्न बॅटल रॉयल प्रमाणेच गन आणि गेमप्ले सिस्टम देण्यात येणार आहे.

गेम सध्या डेवलपमेंट मध्ये आहे. कंपनीने याबाबत 21 सेकंदाचा व्हिडिओही आपल्या साइटवर शेअर केलाय. व्हिडिओमध्ये गेमप्लेबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नसली तरी कंपनी आगामी काळात अधिक तपशील शेअर करू शकते असा विश्वास आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा