महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण, मात्र रिकव्हरी रेटही चांगला 

11

मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: देशभरात कोरोनानं थैमान घातलंय. अशातच संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. सोबतच महाराष्ट्रातला पुणे जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. असं असलं तरी महाराष्ट्रच रिकव्हरी रेट म्हणजेच कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णाचं प्रमाण हे देखील चांगलं आहे. सध्या महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा ७५.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत १८ हजार ३९० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात २० हजार २०६ रुग्ण बरे होऊ गेले घरी आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख ४२ हजार ७७०वर पोहोचला. यापैकी आतापर्यंत ३३ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  

 

सध्या राज्यातील मृत्यूदर २.६९ एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६० लाख १७ हजार २८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख ४२ हजार ७७०(२०.६५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार २०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४ हजार ९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात एकूण २ लाख ७२ हजार ४१० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे