महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सागर मारकडला सुवर्णपदक

पुणे : म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शनिवारी(दि.४) रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सागर मारकड याने माती विभागातील ६१ किलो वजनी गटात गतवर्षी सुवर्णपदक पटकाविलेल्या निखील कदमला चितपट करत सुवर्णपदक पटकावलं आहे.
सागर मरकड याचे राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग पाचवे सुवर्णपदक ठरले असून सागरने ५७ किलो गटात चार सुवर्णपदके पटकावली होती, तर ६१ किलो वजनी गटात त्याचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.

याउलट अंतिम फेरीत पराभूत झालेल्या निखिल कदम याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागलं. हनुमंत शिंदे ( सोलापूर) याने कांस्यपदक पटकावलं. हनुमंतने सौरभ राऊतचा पराभव केला. ६१ किलो वजनी गटातील माती विभागातील उपांत्य फेरीत सागर मारकडने औरंगाबादच्या सौरभ राऊतला तर निखिल कदमने हनुमंत शिंदेवर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा