Maharashtra News Uncut Marathi Live Updates: ताज्या बातम्यांकरिता आणि समाज, प्रशासन व राजकारणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनसे) हिंदी पुस्तकांवर शाई फेकत आणि पुस्तके फाडत पुण्यातील बालभारती कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले, कारण राज्य सरकारने इयत्ता १ली ते ५वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा सक्तीची केली. रायगडमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला, तर बारामतीत जिल्हा बँक रात्री ११ वाजता सुरू राहिल्याने चर्चा रंगली. गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच २६,००० कोटी रुपयांचे ८ आयपीओ बाजारात येणार आहेत. जालन्यात १२५ जांभळाच्या झाडांनी एका शेतकऱ्याला लाखोंचा नफा मिळवून दिला. बीडमध्ये निराधार महिलांचा ११ महिन्यांचा पगार थकल्याने नाराजी पसरली आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात जळीत कक्षात डॉक्टर नसल्याने नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच, एका महिलेने अज्ञात कारणाने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला; तिला तातडीने बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीडमधील मोडकळीस आलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी मागणी जोर धरत आहे. वाळुजमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, वाळुज एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी होत आहे. जेजुरी-मोरगाव रस्त्यावर कार आणि पिकअप टेम्पोच्या जोरदार धडकेत अपघात झाला.आता एकाच क्लिकवर राहा अपडेटेड! न्यूज अनकट एक्सप्लेनड तुमच्यासाठी घेऊन येत आहे देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडीच सखोल विश्लेषण आणि राजकारण, अर्थव्यवस्था, समाज, शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि बरेच काही – आम्ही सखोलपणे पण अगदी साध्या आणि सोप्या शब्दांत समजावून सांगतो.,एकाच ठिकाणी, एकाच भाषेत, तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक माहिती दररोजच्या बातम्यांमागील सत्य जाणून घेण्यासाठी आणि भारतातील विविध घटकांवर अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा!














































