केडगाव, १३ नोव्हेंबर २०२०: आजचा युवक शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावा तसेच सुसंस्कारित सदाचारी व व्यसनमुक्त व्हावा व युवकांमध्ये संत साहित्याची ओळख जागृती व आवड निर्माण व्हावी यासाठी तसेच अध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे ज्ञान हे प्रत्येक तरुणांमध्ये रुजवणे यासाठी मागील पन्नास वर्षांपासून संतसेवा व वारकरी सेवा करत आहे.
महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांच्या पूर्व हवेली तालुका समितीचा पद वाटप समारंभ आज केडगाव येथे पार पडला व हवेली तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष ह भ प चेतन महाराज, माथेफोड शास्त्री, उपाध्यक्ष शंकर रामभाऊ वाबळे, व गणपत निवृत्ती कुंजीर, कार्याध्यक्ष शरद महाराज खेडेकर, सचिव अमोल काशिनाथ गावडे महाराज, वाडेबोल्हाई कोषाध्यक्ष अरुण गुलाब रिकामे, खजिनदार गोरख बाळासाहेब थोरात, प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब लक्ष्मण जवळकर, संघटक बाबुराव रामचंद्र कोंडे, कार्यकारणी सदस्य दिपक दिनकर कोळी, ऋषिकेश कोतवाल, मार्गदर्शक अण्णा बोडके, अशा पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांना पदे वाटप करण्यात आली आहेत.
तालुक्यामध्ये संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्याची व संघटन बांधणीची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे अध्यात्मिक क्षेत्रात मागील २० वर्षांपासून त्यांनी केलेल्या अनेक सामाजिक कार्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष कांचन कुल, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, रामेश्वर महाराज शास्त्री, मराठवाडा अध्यक्ष महादेव महाराज बोराडे, संतोष महाराज पायगुडे, निवृत्ती महाराज बोरकर, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काळजे, विभागीय अध्यक्ष जीवन खाणेकर, जालिंदर काळोखे व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे