जाफ्राबाद, जालना ९ मार्च २०२४ : जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव मठ येथील ओमशिवेश्वेर महादेव मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्त भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. महत्वाचं मानलं जाणाऱ्या ओमशिवेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी पाहायला मिळाली. हर हर महादेवाचा जयोघोष करत भाविकांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं काल रात्रीपासूनच शिवभक्तांनी इथं दर्शनासाठी गर्दी केली होती.
भाविकांच्या अलोट गर्दीने व हर हर महादेव च्या जयघोषाने मंदिर दणाणले. यंदा ओमशिवेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे, या दरम्यान शेकडो शिवभक्तांनी दर्शन घेतले. मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून हा सप्ताह सात दिवस चालणार असुन ०९ मार्चला सांगता होणार आहे. शिवरात्रीनिमित्त भाविक भक्त मनोभावे दर्शन करून अभिषेक, पुजा करतात. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. भल्या पहाटे दर्शनासाठी दुहेरी रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्री निमित्त ओमशिवेश्वर मंदिराला यावर्षी वेगळ्या पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक सामाजिक आणि महाप्रसादाची रेलचेल दरवर्षी असते.
दरम्यान, मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.ग्रामीण भागातून आलेले भाविक मिळेल त्या वाहनाने मंदिर परिसरात दाखल झाले. भाविकांच्या गर्दीने ओमशिवेश्वर मंदिराचा परिसर फुलून गेला. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे स्वयंसेवक तैनात आहेत. चहा, पाणी व ऊसळीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे