माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन आता राज्यपाल

31

श्रीलंका : श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आता एक नवीन जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
श्रीलंकेतील नवनिर्वाचित राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी मुरलीधरनची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
राष्ट्रपतींकडून निवडण्यात येणाऱ्या तीन नव्या राज्यपालांमध्ये मुरलीधरनचा समावेश असणार आहे.
श्रीलंकेच्या उत्तर प्रांतासाठी मुरलीधरन, तर पूर्व प्रांतासाठी अनुराधा यहामपाथ आणि उत्तर मध्ये प्रांताच्या राज्यपालपदी तिस्सा विथाराना यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्षांनी परिपत्रक काढून त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.