मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

5

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आज साकळी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या व्यक्तीला जुहू पोलिसांनी जुहू परिसरातून अटक केली आहे. चौकशी दरम्यान या व्यक्तीने दारुच्या नशेत कॉल केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दारुच्या नशेत धमकी दिल्याचे समोर आले आहे. यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करत, त्यांच्यावर जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलीसांना रविवारी एका व्यक्तीकडून पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. या व्यक्तीने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉल करणारी ही अज्ञात व्यक्ती मुंबईतील विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा केला आहे. फोन करणाऱ्याने पोलीसांना फोन केल्यानंतर या व्यक्तीने फोन बंद केला होता, अशी माहिती देखील मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा