पुण्यातील सिंहगड रोडवरील बेवारस वाहने ‘जैसे थे’

धायरी, पुणे ६ ऑगस्ट २०२३ : गेल्या पंधरा वर्षांपासून सिंहगड रस्त्याच्या पदपथावर व अभिरुची मॉल परिसरातील मोकळ्या जागेत हवेली पोलीस ठाण्याने कारवाई करुन जप्त केलेली वाहने ठेवली होती. यातील अभिरुची मॉल परिसरातील वाहने नुकतीच उचलण्यात आली आहे. मात्र, सिंहगड रस्त्यावरील रहदारीस अडथळा ठरणारी वाहने अद्यापही पदपथावर पडून आहेत.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही वाहने लवकरात लवकर उचलण्यात येणार असल्याचे पोलीस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु याबाबत अद्यापही कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही सर्व वाहने विविध गुन्ह्यांत पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस ठाण्याला जागा नसल्यामुळे ही वाहने अभिरुची मॉल परिसरातील मोकळ्या जागेत सिंहगड रस्त्याच्या पदपथावर ठेवण्यात आली आहे.

या वाहनांमध्ये झाडे, झुडपे वाढली असून, कचराही साचला आहे. तसेच सध्या पावसाच्या पाण्याची डबकी या ठिकाणी साठली आहेत. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वाहनांमुळे पादचारी, वाहनचालकांसह परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असून, हा पदपथ मोकळा होणार तरी कधी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा