मनोज जरांगे यांची आज अंतरवली गावात भव्य सभा, अंबड तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर

जालना, १४ सप्टेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आज मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात अंतरवली गावात सभा घेत आहेत. या भागातील सर्व प्रमुख रस्त्यांवर भीषण वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ७ डीवायएसपी, २१ पोलीस निरीक्षक, ५७ सहायक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, १००० पोलीस हवालदार, २०० वाहतूक शाखेचे कर्मचारी, एक एसआरपीएफ तुकडी, चार बीडीडीएस पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय संमेलनस्थळाच्या परिसराची पाहणी करण्यासाठी चार ड्रोनचा वापर केला जात आहे.

अंतरवली सराटी गावात आज होणाऱ्या सभेच्या दृष्टीने गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. याशिवाय राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगसाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. यामध्ये वडीगोदरी बाजार समितीच्या आवारात ६२ एकर, दोडदगाव येथे ६ एकर, सभा भवनाजवळ ६ एकर, रामगव्हाण येथे ६ एकर, अंकुश नगर येथील समर्थ कारखाना, वडीगोदरी येथील ढकलगाव शिवरा येथे आवश्यकतेनुसार वाहनांचे पार्किंग करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा