मराठा बांधव रस्त्यावर; अहमदपूर तालुका कडकडीत बंद

अहमदपुर, लातूर १५ फेब्रुवारी २०२४ : मराठा समाजासाठी वेळोवेळी उपोषण करत सरकारला जाग आणण्याचे काम करणारे मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटे येथे १० फेब्रुवारी पासून उपोषणाला बसले आहेत. सगेसोयरे संदर्भात विशेष अधिवेशनात अध्यादेश काढावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्यांना पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत अहमदपुर तालुक्यात बंद पाळण्यात आला.

व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून यात आपला सहभाग नोंदवला आणि अहमदपुर शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवली. यावेळी मराठा बांधव रस्त्यावर उतरून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला असून बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजमहंमद शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा